Oxford Languages and Google

गुगलची इंग्रजी-मराठी दुभाषिक डिक्शनरी ही ऑक्सफर्ड लँग्वेजेस तर्फे उपलब्ध करून दिली जाते.

 

ऑक्सफर्ड लँग्वेजेस हे जगातील सर्वात अग्रेसर डिक्शनरी प्रकाशक असून जगातील वेगवेगळ्या 50 हून अधिक भाषांमध्ये आधिकारिक डिक्शनरीच्या निर्मितीचा आणि प्रसारणाचा 150 वर्षाचा अनुभव आहे.

ह्या दुभाषिक इंग्रजी-मराठी डिक्शनरीत काय काय समाविष्ट आहे?


 

ह्या इंग्रजी-मराठी डिक्शनरीत सर्वसमावेशक असे 50,000 हून अधिक सर्वसंबंधी शब्द आणि वाक्प्रचार अगदी सुलभ आणि स्पष्ट पद्धतीने मांडले आहेत. ही दुभाषी डिक्शनरी आहे, म्हणजे यात मुख्य इंग्रजी शब्द हे दोन्ही इंग्रजी आणि मराठीत व्याख्येसह दिलेले आहेत. ही इंग्रजी शिकू पाहणाऱ्या मराठी भाषिकांसाठी, शिक्षकांसाठी आणि भाषांतरकारांसाठी सर्वाधिक उपयोगी आहे.

आमच्या डिक्शनरी कश्या पद्धतीने बनवल्या जातात?


 

ऑक्सफर्ड लँग्वेजेस मध्ये भाषेचे अगदी काटेकोर चित्र दाखवण्यासाठी आम्ही पुरावाधारित दृष्टिकोन ठेवण्यास कटिबद्ध आहोत.
 
आमची डिक्शनरी शब्दाच्या व्याख्येसाठी, स्पेलिंग आणि व्याकरणीयदृष्ट्या प्रमाणित शब्दाच्या अभ्यासावर आधारित आहे आणि ह्याच अभ्यासावर शब्दाच्या वापराबाबत मार्गदर्शन करते. नवीन शब्दाच्या ओळखीसाठी आणि त्यांच्या वापरानुसार अर्थ जाणून घेण्यासाठी टीम या प्रणालीचा वापर करते.
 
डिक्शनरी बनवण्यासाठीच्या ह्या पुरावाधारित दृ‍ष्टिकोनाला डिस्क्रिप्टीव लेक्सिकोग्राफी म्हणतात. भाषा कशी वापरावी यापेक्षा भाषा कशी वापरल्या जाते आणि जगभरात लोकांकडून कशी वापरल्या गेलेली आहे हे वर्णन करण्याचे आमच्या डिक्शनरीचे उद्दीष्ट आहे.
 
आम्ही निर्मिती केलेल्या किंवा संपादित केलेल्या सर्व डिक्शनरींच्या दर्जाची आमच्या तज्ञांच्या टीमकडून कसून तपासणी केली जाते जेणेकरून वापरकर्त्यांना आमच्या प्रत्येक भाषेच्या अचूक आणि अर्थपूर्ण मांडणीच्या कुवतीबाबत विश्वास राहील.

आम्ही आमच्या डिक्शनरीत स्थानिक शब्दांचा आणि बोलीभाषेचा समावेश का करतो?


 

भाषेच्या शब्दकोशामध्ये अचूक आणि सर्वसमावेशक शब्दांचा साठा करण्याच्या आमच्या मोहिमेत आम्ही खऱ्याखुऱ्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या स्थानिक शब्दांचा आणि बोलीभाषेचा संग्रह करतो.
 
वेगवेगळ्या प्रदेशातील बोलीभाषांतील सर्व स्थानिक शब्द स्पष्टपणे आमच्या डिक्शनरीत दर्शवले जातात जेणेकरून वापरकर्ते शब्दाच्या स्थितीबाबत आणि त्याच्या वापराबाबत आश्वासक राहू शकतात.

आम्ही आमच्या डिक्शनरीत उदाहरणात्मक वाक्यांचा समावेश का करतो?


 

उदाहरणार्थी वाक्य हे संदर्भासाठी शब्द सर्वसाधारणपणे कश्याप्रकारे वापरल्या जातात हे लोकांना कळण्यासाठी दिलेले आहेत. हे वाक्य पर्यायी म्हणून वापरले जात नसून ते अधिकची माहिती देतात.
 
आमची उदाहरणात्मक वाक्ये ही व्याख्येपासून व पाहिजे असलेल्या माहितीपासून विचलित न करता त्या शब्दाच्या व्याकरणात्मक आणि अर्थाच्या आधारासाठी निश्चित केलेली आहे.
 
आम्ही तथ्यात्मकरीत्या चुकीची, पूर्वग्रहदूषित किंवा अपमानकारक विधाने वगळतो आणि आमच्या दर्जाशी तडजोड करणाऱ्या विशिष्ट बाबतीत आम्ही तुमच्या अभिप्रायाचे नेहमीच स्वागत करतो.

डिक्शनरीच्या एखाद्या विशिष्ट एंट्रीबद्दल जर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर कृपया खालील फॉर्म भरा.